युतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना एकत्र आले आहेत. त्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप कशा पद्धतीने होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र भाजप आणि सेनेच्या नेत्यांकडून काही जागांवर दावा केला जात आहे. तर भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या जागा वाटपावर भाष्य केले आहे. यावरून शिवसेना खा. संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत युतीच्या विधानसभेच्या जागावाटपावर भाष्य करू नये, असे आवाहन केले आहे.

याबाबत संजय राऊत म्हणाले की, युतीमध्ये जागावाटपाबद्दल कोणताही तिढा बाकी राहिला नाही, शिवसेना-भाजप जुळे भाऊ आहेत. कोणताही वाद नाही. तसेच दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी जागा वाटपाबाबत चर्चा केली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी युतीच्या विधानसभेच्या जागावाटपावर भाष्य करू नये.

दरम्यान संजय राऊत सध्या आदित्य ठाकरे यांच्या बरोबर जन आशीर्वाद यात्रेवर आहेत. तर या यात्रेत संजय राऊत यांनी नवीन नारा दिला आहे. आदित्य ठाकरेंनीच महाराष्ट्राच नेतृत्व कराव अशी मागणी केली आहे.