‘चंद्रकांत पाटील म्हणतात पुन्हा पहाटे भूकंप होणार, त्यांनी काय गजर लावला आहे का?’

Chandrakant patil and sanjay raut

मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात भूकंपाच्या चर्चांना उधाण आले होते. सुरुवातीला ही भेट गुप्त असून महाविकास आघाडीतील अस्थिरता बघता शिवसेना सावध भूमिका घेत आपल्या जुन्या मित्र पक्षाला साध घालण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. मात्र ही भेट गुप्त नसून सामनाच्या मुलाखतीसाठी देवेंद्र फडणवीसांना आमंत्रित करण्यासाठी झाल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले होते.

तर, ‘राज्यात सध्या मध्यावधी निवडणूक होण्यासारखी परिस्थिती आहे. मात्र मध्यावधी निवडणूक कुठल्याही पक्षाला नको आहे. आम्हाला पण मध्यावधी नको. पण हे सरकार टिकणार नाही,’ असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. “चंद्रकांतदादा पहाटे पुन्हा भूकंप होणार असल्याचं म्हणाले. त्यांनी गजर लावला आहे का? चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडं मी सकारात्मक दृष्टीने पाहतो. राज्यात निवडणुका होणार, की नाही होणार? हे सांगण्याची जबाबदारी निवडणूत आयोगाची असते. निवडणुका कधी होणार हे जर चंद्रकांत पाटील यांना माहित असेल आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडं आली असेल, तर त्याचं स्वागत केलं पाहीजे” असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीवर संजय राऊत म्हणतात…

“मी फ्रीडम ऑफ स्पीच मानणारा व्यक्ती आहे. ‘सामना’च्या सर्व मुलाखती अन एडिटेडच असतात. फडणवीस यांची मुलाखतही ‘अन एडिटेड असेल. देवेंद्र फडणवीस जे बोलतील ते सगळ्यांसमोर असेल, मग आमच्यावर टीका असो किंवा इतर काही, मुलाखत अनकटच असणार,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या