मोदींनी आता अमेरिकेची निवडणूक लढवायला हरकत नाही – चंद्रकांत पाटील

chandrakant patil चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा: सांगलीतील नागरिकांनी भाजपला सहकार्य केलंं, त्यामुळे महापालिका एकहाती भाजपच्या ताब्यात आली आहे. सांगली महापालिका जिंकल्याने आता मोदी यांनी अमेरिकेची निवडणूक लढवली तरी हरकत नाही, असे अजब विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज सकाळी शहरातील आमराई आणि बापट मळा परिसरात मॉर्निंग करणाऱ्या नागरिकांची चंद्रकांत दादा यांनी भेट घेतली, यावेळी सांगली महापालिका निवडणुकीत सर्व नागरिकांनी साथ दिली, आता लोकसभा निवडणुकीत देखील नागरिकांनी भाजप उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मागील काही दिवसांपासून वेगवेगळी विधाने करत खळबळ उडवून दिली आहे. आता मोदींनी थेट अमेरिकेची निवडणूक लढवायला हरकत नाही, असे विधान त्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी मिशन शक्तीमध्ये अंतराळात उडवण्यात आलेले सॅटेलाईट चीन किंवा पाकिस्तानचं असू शकत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. मुळात वापरात नसलेले सॅटेलाईट भारताचेच होते.