मुंबई : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत हात मिळवत हे सरकार स्थापन केले. मागील विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. हे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याचा दावा करत होते. त्यांनी अनेक वेळा सरकार पाडण्याच्या तारखाही निश्चित केल्या. त्याप्रमाणे अनेक वेळा ह्या तारखाही बदलत राहिले. मात्र अखेर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि चंद्रकांत पाटलांची इच्छा पूर्ण झाली.
चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा मागील महाविकास आघाडीच्या सरकार बाबत टीका केली आहे. हे सरकार पडणार होते हे त्यांनाही माहित होतं. म्हणूनच यांनी काही केलं नाही, तसेच आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडावा, असा टोला यावेळी चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील आज मुंबईत होते. त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले की, देवेंद्रजी सगळ्यांना माफ केलं असे बोलले. मात्र आम्ही कोणालाही माफ करणार नाहीत. देवेंद्रजी यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ उघडला पाहिजे आणि यासाठी एखाद्या कडक आमदाराकडे याची जबाबदारी दिली पाहिजे. त्याच्याकडे मागील अडीच वर्षाच्या काळातील घोटाळ्यांची यादी तयार करण्याचे काम दिले पाहिजे. असे सुचक विधान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाविकास आघाडीचे सरकार असताना मी अनेक वेळा बोललो होतो की हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. माझ्या या बोलण्याचा अनेक वेळा महा विकास आघाडीने खिल्लीही उडवली. शेवटी देवेंद्रजींचे नेतृत्वाचा हे सरकार आलं. देवेंद्रजी आणि मी ठरवलं होतं की सरकारी येईपर्यंत काहीही बोलायचे नाही. परंतु मी अनेक वेळा बोलून दाखवले होते की सरकार येणार आहे. असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Chhagan Bhujbal | काय पाऊस, काय पूर, काय खड्डे, समद ओक्के ; भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टीका
- Virat Kohli : “कोहलीला ‘या’ कारणामुळे बीसीसीआय संघातून वगळण्याचे धाडसही…”; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
- Eknath Khadse : “१५ दिवस झाले तरी हे सरकार अजूनही जेवणावळीतच व्यस्त”; एकनाथ खडसेंचा शिंदे सरकारवर निशाणा
- Mahesh Tapase:राज्य अतिथीगृहात कार्यक्रम घेतल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्यावर कारवाई करा – महेश तपासे
- Gopichand Padalkar : जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक – गोपीचंद पडळकर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<