fbpx

शेतकऱ्यांना मोठा दिलासा, चारा छावण्या जून अखेरपर्यंत चालू राहणार – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा :दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर असल्याने चारा छावण्या जून अखेर पर्यंत सुरु राहणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पाटील औरंगाबादमध्ये दुष्काळ भागांची पाहणी करत होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे, सर्व पक्षाचे नेते दुष्काळी दौरा करत आहेत. याचदरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे औरंगाबाद येथील दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. पाटील यांनी जिल्ह्यातील चारा छावणीची पाहणी केली. त्यामुळे, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आम्ही राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत आहोत. दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे चारा छावण्या जून महिना अखेरपर्यंत सुरु ठेवाव्या लागतील. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागनाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.