पुण्यातील आठही जागा भाजपकडेचं ; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातल्या आठ विधानसभेच्या जागा भाजपकडे राहतील, असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. चंद्रकांत पाटील पुण्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. भाजपचा आज पुण्यात कार्यकर्ता मेळावा पार पडला. दरम्यान चंद्रकांत पाटील बोलत होते. त्यावेळी विधानसभेच्या जागावाटपावर बोलताना पुण्यातल्या जागांबाबत पाटील यांनी सूचक विधान केलं.

ज्या जागा आपल्याकडे नसतात, त्यावर दावा करायचा असतो. पुण्यातल्या आठही जागा भाजपकडे आहेत. त्यामुळे त्याबाबत कसला दावा करायचा, असे पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर जागावाटपात काही जागांबाबत विचार केला जातो. कोअर कमिटीच्या बैठकीत ते ठरवलं जाईल. भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळे लढण्यात धोका आहे, असं आपलं मत आहे. महाराष्ट्र सरकार स्थापन करायला एक कोटी 70 लाख मतदान लागतं. हे मतदान भाजप महायुतीला मिळेल आणि 220 जागा महायुती जिंकू शकेल, असं पाटील यांनी म्हंटले.