एकमेकांवर सडकून केलेल्या टीकेनंतर दोघेही एकाच सोफ्यावर

एकमेकांवर सडकून केलेल्या टीकेनंतर दोघेही एकाच सोफ्यावर

Chandrakanat Patil and Sanjay Raut

नाशिक : राजकारणात काहीही घडू शकतं म्हणतात ते अगदी खरं आहे. कितीही जोरदार टीका केली तरीही काही काळानंतर ते नेते एकत्र आल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणें यांचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्यातील वाद अगदी टोकाचा आहे. मात्र हे दोन्ही नेते चिपी विमानतळावर एकत्र आल्याचे आपण सर्वांनी पाहिले.

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केल्याच्या निर्णयानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात वाद सुरु झाला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त करत हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं म्हंटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी टीका केली.

माझा शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ. देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. या दोन्ही नेत्यांच्या टीका सत्रानंतर आज या तिन्ही नेत्यांमध्ये मनमोकळ्या गप्पाही दिसून आल्या. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हे दोन्ही फक्त एका कर्यक्रमात एकत्र नाही तर ते या विवाह सोहळ्यात एका सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले आहेत.

देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शेवसेना या सर्व पक्षांचे नेते पाहायला मिळाले आहेत. टीका-टिप्पणीनंतर आज संजय राऊत, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील एकाच सोफ्यावर बसून गप्पा मारताना दिसले. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातही कधी भ्रष्टाचाराचे आरोप, कधी वैयक्तिक टीका पाहायला मिळाली. दुसरीकडे भुजबळ आणि राऊतांमध्येही खडाजंगी पाहायला मिळाली होती.

महत्वाच्या बातम्या