fbpx

‘मराठा समाजाला आरक्षण दिले, धनगर समाजालाही आरक्षण देणार’

सांगली : आम्ही जाहीर केल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिले. ते सर्वोच्च न्यायालयातही टिकेल. त्याचप्रमाणे धनगर समाजालाही आरक्षण देण्यात येणार आहे, अशी फेर ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी मिरजेत दिली. सांगली महापालिका क्षेत्रातल्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, धनगर समाजाला अधिवासीच आरक्षण दिले जाईल, धनगर समाजाला आरक्षण देताना अ आणि ब अशी वर्गवारी करून आरक्षण देता येणं शक्य आहे, असं मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.