पुणे – बाबासाहेब पुरंदरे यांच भाषण आणि त्यांच्या लिखानएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कोणी देखील केला नाही, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पुण्यात एका कार्यक्रमात केले होते. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाटील म्हणाले की स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून लोकांना विचलित करण्यापेक्षा तुम्हीच पर्याय द्या, असा खोचक टोला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पवारांना लगावला आहे.
पुण्यातील बालगंधर्व येथे महाराष्ट्र कीर्ति सौरभ प्रतिष्ठान पुणे आयोजित शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला आहे. यावेळी यंदाचा शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार डॉ. गो. बं. देगलूरकर यांना देण्यात आला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. मला आज व्यासपीठावरून जे मांडायचा होत ते देगलूरकर यांनी मांडला आहे. स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी आपण दुसऱ्यावर टीका करून ज्या व्यक्तिमत्वाचा समाजाला उपयोग होणार आहे. त्या व्यक्तिमत्वाने जे संशोधन केले ते संशोधन लोकांना उपयोगी पडणार आहे. त्याच्यापासून लोकांना विचलित करतात. तुम्हीच पर्याय द्या जे आहे. ते नष्ट करायचं असेल तर त्याच्यापेक्षा प्रभावी तुम्ही पर्याय द्या, की जो लोकांना पटला पाहिजे. लोकांना ते तुम्ही फुकट वाटा पण तुम्ही जे लिहिलेलं आहे, ते खरं असणार त्याच्यामध्ये काही दम असेल तर लोक वाचतील असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Ashok Chavan | काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर अशोक चव्हाण यांनी केला खुलासा! म्हणाले…
- Supreme Court | ठाकरे कि शिंदे, कोणाच्या बाजूने लागणार निकाल?; उद्या होणार सुनावणी
- Chandrakant Patil | “स्वतःला प्रोजेक्शन मिळवण्यासाठी” ; पवारांच्या पुरंदरेंवरील टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
- Ayman Al-Zawahiri | अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या गुप्त ऑपरेशनमध्ये ठार
- Bhagat Singh Koshyari | अखेर राज्यपालांचा माफीनामा! म्हणाले होते, मुंबईतून राजस्थानी-गुजराती गेल्यास काय उरणार?
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<