Share

Chandrakant Patil | उदयनराजेंना माझी हात जोडून विनंती, ‘हा’ विषय संपवा – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद शमण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या मुद्द्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. विविध राजकीय पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचे पालन करतात. अशा स्थितीत विविध अवमानकारक विधाने करून त्यांचा अपमान होत असताना या राजकीय पक्षांना राग का येत नाही? या मुद्द्यावर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजेंना विषय संपवण्याची विनंती केली आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. आमच्यासाठी ते आदरणीय आहेत. ‘श्रीमंत छत्रपती उदयनराजे’ याच्याशिवाय त्यांचा उल्लेख करणे बरोबर नाही. माझी राजेंना हात जोडून विनंती आहे. ज्या राज्यपालांनी शिवनेरी किल्ल्यावर पायी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्याकडून बोलण्यामध्ये एखादी गोष्ट चुकीची झाली असेल. त्यांना माझी विनंती आहे की हा विषय आता कुठेतरी संपवावा लागेल. राज्यपालांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करण्याचा विषय असू शकत नाही.

उदयनराजे नाराज –

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यावर सगळे शांत बसले असले तरी मी शांत बसू शकत नाही. मी एक शिवभक्त आहे आणि त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही, असं उदयनराजे म्हणाले. वेगवेगळ्या पक्ष, संघटना, विचारवंत असे सर्वच जण प्रथम महाराजांचे नाव घेतात. त्यांच्या कार्याला महाराजांचे विचार दिशा देतात. अशा महापुरुषांच्या विचारांची तोडमोड करण्याचे स्वातंत्र्य या लोकांना कोणी दिलं? असा सवाल त्यांनी केला.

लोकं कोडगी झाली आहेत. सोईप्रमाणे होणारा वापर हे चालणार नाही. मी लढणारा आहे, मी रडणारा नाही. मी रायगडला जाणार आहे. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन माझी भावना व्यक्त करणार आहे. त्यावेळी तिथं सगळंच बोलतो, असा इशारा देखील उदयनराजे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Chandrakant Patil | पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद शमण्याचे नाव घेत नाही. दरम्यान, …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now