डॉल्बी जामर यंत्रणा बनवा दहा लाख रुपये मिळवा

Chandrakant Patil

कोल्हापूर : येत्या आठ दिवसात जो कुणी डॉल्बी जामर यंत्रणा बनवून देईल आणि तो सिद्ध करेल त्याला आपण दहा लाख रुपये बक्षीस देऊ, अशी खुली ऑफर राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.

गणेश उत्सवात डॉल्बी च्या आवाजावरून सरकार आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्या वाद सुरु आहेत. सरकार ने डॉल्बी लावण्यास बंदी घातल्यानंतर या वादाला खरी सुरवात झाली आहे.

दरम्यान, त्यानंतर डॉल्बी लावण्यावरुन सार्वजनीक तरुण मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये होणारे वाद टाळण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी ही खुली ऑफर दिली आहे. कोल्हापूरातील मानाच्या शिवाजी चौक इथल्या महागणपतीच्या उद्धाटन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.