… तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार; चंद्रकांतदादांनी दिले युतीचे संकेत !

पुणे : कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी उमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर मराठा आरक्षणासह राज्याच्या इतर १२ मुद्द्यांवर मोदींशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांची एकांतात तब्बल ३० मिनिटे चर्चा झाली. यामुळे पुन्हा ‘युती’ होणार का ? यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान आता भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावर आज पुन्हा भाष्य केल्याने राजकीय क्षेत्रातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘दोन मोठ्या माणसाच्या भेटीत काय घडलं असले हे सांगता येणार नाही. वाघाची दुश्मनी आमची कधीच नव्हती. त्यांची जुनी मैत्री ही मोदींशी आहे. फडणवीस आणि पाटलांशी त्यांचं पटत नाही. जर आमच्याशी मैत्री असती तर 18 महिन्यांपूर्वी आमचं सरकार आलं असतं,’ अशी सल त्यांनी बोलून दाखवली.

पुढे ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत,’ असं विधान करून चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा ‘युती’चे संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP