Chandrakant Patil | मुंबई : राज्यपाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आक्रमक भूमीका घेतली होती. एवढंच नाही आता रायगडावर आक्रोश करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले यांना उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट हात जोडून विनंती केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी थेट हात जोडून उदयनराजे भोसले यांना हा विषय इथेच संपवण्याची मागणी केली आहे. उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची मुंडकी छाटावी वाटतात असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तर आता रायगडावर जाऊन आक्रोश करणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
तुमच्या आई-वडिलांना कोणी बोललं तर तुम्ही सहन केलं असतं का?, असा संतप्त सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. शिवाजी महाराज नसते तर तुमचे आई-वडीलही नसते असे उदयनराजे म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यावर सगळे शांत बसले असले तरी मी शांत बसू शकत नाही. मी एक शिवभक्त आहे आणि त्या घराण्यात माझा जन्म झाला आहे. त्यामुळे शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही असं ते म्हणाले. वेगवेगळ्या पक्ष, संघटना, विचारवंत असे सर्वच जण प्रथम महाराजांचे नाव घेतात. त्यांच्या कार्याला महाराजांचेच विचार दिशा देतात. अशा महापुरुषांच्या विचारांची तोडमोड करण्याचे स्वातंत्र्य या लोकांना कोणी दिलं? असा सवालही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, महापुरुषांच्या सन्मानासाठी रोहित पवारांचं ‘आत्मक्लेश’ आंदोलन
- Sanjay Raut | “आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या”; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊतांचं उदयनराजेंना आव्हान
- Jitendra Awhad | “मेहेंदळेंच्या तोंडून हे वाक्य वदवून घ्या”, जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना आव्हान
- NCP | इतिहासाचे खोटे दाखले देऊन पवारांवर टीका करायची हे राजकीय षडयंत्र – राष्ट्रवादी काँग्रेस
- Sanjay Raut | “कर्नाटकने सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी…”; संजय राऊतांचा टोला