‘त्यांना’ अंबाबाई सद्बुद्धी देवो!

कोल्हापूर : कुणाचेही काही काढून न घेता मराठ्यांना आरक्षण दिले आहे. हे आरक्षण कायद्याने टिकणारे आहे. कायद्यातील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांचाही ज्येष्ठ वकिलांनी अभ्यास केला आहे. यातूनही काहीजण कोर्टात जाणार आहेत. त्यांना अंबाबाई सद्बुद्धी देवो! असा टोला आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंडळींना पालकमंत्री आणि आरक्षणविषयक नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

काल चंद्रकांत पाटील यांचे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास खास विमानाने विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर साडेचारच्या सुमारास त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. यानंतर बोलताना पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Rohan Deshmukh

नेमकं काय म्हणाले चंद्रकात पाटील ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ डिसेंबरच्या आत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. ३० नोव्हेंबरला रात्री राज्यपालांची सही झाली. रात्री प्रिंटिंग प्रेस सुरू ठेवली आणि शनिवारी सकाळी सहाच्या आत या आरक्षणाचे गॅझेट निघाले. आम्ही कच्च्या गुरूचे चेले नाही.आमदार, मंत्री झाल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला शुक्रवारी झाला. १९६८ पासून अनेक चर्चा, बैठका, मोर्चे झाले; परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळाले नव्हते. ते आमच्या सरकारने दिले. यापुढील काळात धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजालाही कायद्यातील तरतुदीनुसार आरक्षण देण्यात येईल. कुणाचेही काही काढून न घेता मराठ्यांनाआरक्षण दिले आहे. हे आरक्षण कायद्याने टिकणारे आहे. कायद्यातील स्वल्पविराम आणि पूर्णविरामांचाही ज्येष्ठ वकिलांनी अभ्यास केला आहे. यातूनही काहीजण कोर्टात जाणार आहेत. त्यांना अंबाबाई सद्बुद्धी देवो!

Latur Advt
You might also like
Comments
Loading...