सेना भाजपसोबत आली तर दोन्ही काँग्रेसचा आगामी निवडणुकांत धुव्वा उडेल : चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेना भाजपसोबत आली तर दोन्ही काँग्रेसचा आगामी निवडणुकांत धुव्वा उडेल. गेल्या चार वर्षांत वेगळे लढूनही भाजपने सर्व निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले आहे. तसेच शिवसेनेनेही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवले आहे. मात्र, आता काँग्रेसला मदत होईल, असे शिवसेनेने न वागता युती करावी, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पाटील म्हणाले, मुंबई महापालिकेसह ठाणे, मीरा-भाईंदर,कोल्हापूर आदी निवडणुकांच्या आकडेवारीत भाजप आणि शिवसेना आघाडीवर असल्याचे दिसून आले असून गेल्या चार वर्षांत झालेल्या निवडणुकांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर हेच दिसून येते. जर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लढले तर समोर कोणी उरणारच नाही. यासाठी आता शिवसेनेने विचार करण्याची गरज असून आहे. काँग्रेसला मदत होईल असे न वागता राज्यातल्या जनतेच्या हिताचा विचार शिवसेनेने करावा. काँग्रेसची पंधरा वर्षांची राजवट योग्य होती, असे शिवसेनेला वाटते का? असा प्रश्नही या वेळी त्यांनी उपस्थित केला.मुख्यमंत्री हा आमदारांच्या संख्येवर ठरत असतो. शिवसेनेने आधी युती तर करावी. त्यानंतर ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार शिवसेनेचे आमदार अधिक असतील तर मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

आगामी निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेऊन लढण्याचे सुधीर मुनगंटीवारांचे संकेत

You might also like
Comments
Loading...