येत्या दहा वर्षात रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही – पाटील

टीम महाराष्ट्र देशा- राज्यभरातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नेहमी टीकेचे धनी बनत असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यभरातील रस्त्यावरील खड्ड्यावरुन पाटील यांना लक्ष्य केले जात असताना त्यांनी पुन्हा एकदा येत्या दहा वर्षात राज्यातील एकाही रस्त्याला खड्डा नसेल, असे रस्ते तयार केले जातील असे वक्तव्य केले. कल्याण-पडघा रोडवरील बापसई गावात सुरेश हावरे यांनी उभारलेल्या गृह प्रकल्पातील सदनिकाधारकांना चाव्या वाटप मंत्री पाटील यांच्या हस्ते काल (दि.21) करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण आणि राज्य व राष्ट्रीय महामार्गाची विकास कामे केली जात आहे. 2022 पर्यंत रस्ते विकासाचे चित्र पूर्णपणे बदलेल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रस्ते तयार करणाऱ्यांना कंत्राटदार कंपनीकडे त्याच्या दुरुस्ती देखभालीचे दायित्व दिले जाणार आहे. तीन ते पाच वर्षाचे दायित्व दिले जाईल. रस्ता विकसित केल्यावर तीन ते पाच वर्षात रस्त्यावर खड्डा पडला. रस्ता खराब झाला तर संबंधित कंपनीकडून त्यांची दुरुस्ती देखभाल करणे व बुजविण्याची जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

खड्डेमुक्त रस्त्यावरून आता शरद पवार यांनी केल चंद्रकांत पाटलांना लक्ष

हे काय शहाणपणाचं लक्षण नाही ; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

You might also like
Comments
Loading...