Share

Chandrakant Patil | “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही”

पुणे : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच तापलं आहे. सध्या सगळीकडे निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. तसेच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्यामुळे पुणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

आपल्याबद्दल एका नेत्यानं आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चालणार नाही, असं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना सांगितल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे. आयोजित कार्यक्रमामध्ये ते भाषण करत होते. त्यावेळी त्यांनी हे सांगितलं आहे. पाटलांच्या या दाव्यामुळे अनेक चर्चा होत आहेत.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटलांनी सांगितले की, परवा आपल्या एका केंद्रीय नेत्याची आणि राजू शेट्टी यांची झाली. भेट झाल्यानंतर शेट्टी म्हणाले की दादांनी (चंद्रकांत पाटील) मला संपवलं. ते केंद्रीय नेते 40 वर्ष माझ्याशी जोडलेले असल्याने म्हणाले की दादा कोणाला संपवत नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल. ते म्हणतील जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमची कोल्हापूरची पद्धत आहे. पण दादा मोदी आणि शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही. नशीब पाडला. बाकी काही करायचा त्याचा स्वभाव नाही.

तसेच, 2019 ला काय उचललं मला आणि आणलं पुण्याला असं झालं नाही. यामागे काहीतरी नियोजन असणार. करोनामुळे आणि सरकार गेल्याने हे नियोजन अर्धवट राहिलं आहे. ते पूर्ण करायचं आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर साफ झालं. माढा पवार उभे राहणार होते. काय झालं? नाही उभे राहिले. रणजित निंबाळकर विजयी झाले. 84 हजार मतांनी जिंकले. हातकणंगल्यात रोज उठून आमचे शेट्टी शिव्या द्यायचे. रोज उठून मोदींना शिव्या. ते माझे खूप चांगले मित्र आहेत. म्हटलं तुम्ही चूक करताय. ते अशा भावनेत होते की मला कोण हरवणार नाही. परंतू आपण त्यांना सव्वा लाख मतांनी हारवलं असल्याचं पाटलांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

पुणे : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण खूपच तापलं आहे. सध्या सगळीकडे निवडणूकांचं वारं घुमू लागलं आहे. तसेच राज्याचे उच्च आणि तंत्र …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now