मुंबई: गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते ते तीन कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश आले आहे. दीड वर्षापासून ऊन पाऊस वार या काशाचीच पर्वा न करता शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. आज अखेर मोदी सरकारने हे कृषी कायदे मागे घेतले आहेत.
शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी हे आंदोलन आत्ताच थांबवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. जोपर्यंत संसदेमध्ये या कायद्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात बोलताना म्हणाले की, हे कायदे शेतकऱ्यांच्या हिता साठीच होते मात्र त्यांना समजावून सांगण्यात आम्हीच कुठे तरी कमी पडलो आहोत, असं म्हणत त्यांनी माफी देखील मागितली आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी वक्तव्य केलं आहे. देशातील अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना हे कायदे मान्य आहेत. पण एक विशिष्ट गट हा विषय घेऊन देशभर अडथळे निर्माण करत होता. कायद्यावर स्थगिती असताना तुम्ही आंदोलन का करत आहात अस सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा झाडले. इतरांना वेठीस धरुन स्वतःच्या मागण्या मान्य करुन घेऊ शकत नाहीत असे सुप्रीम कोर्टाने म्हटल्यावरही ऐकले गेले नाही. त्यामुळे मोदींनी ही घोषणी केली असल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
मी स्वतः महाराष्ट्राचा कृषीमंत्री, पणनमंत्री होतो. यातल्या एक कायद्यामध्ये मार्केटच्या बरोबरीने मार्केटच्या बाहेर विकायची परवानगी देण्यात येणार होती. यामध्ये चुकीचे काय होते, असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले, देशामधील अशांतता संपवण्यासाठी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. मात्र, मी मोदींना विनंती करेल की शेतकऱ्यांना समजवून पुन्हा ते कायदे आणले पाहिजे, अशी विनंती देखील चंद्रकांत पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा
- शेतकाऱ्यांसामोर या आधीही घ्यावी लागली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना माघार
- ‘हे’ दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक; केंद्र सराकराच्या निर्णयावर कंगना नाराज
- ‘शेतकरी आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण?’
- ‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी