चंद्रकांत पाटील पुण्याचे, सुट्टीसाठी कोल्हापुरला येतात, तर काहींचं आंदोलन अस्तित्वासाठी: सतेज पाटील

patil mahadik

कोल्हापुर: आज राज्यभरात दूध उत्पादकांच आक्रमक आंदोलन सुरु आहे. तर, या आंदोलनात दूध उत्पादकांचा भाववाढीच्या मागणी पेक्षा राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका जास्त रंगली असून तीच चर्चा होत असल्याचं दिसत आहे. आज कोल्हापुरात देखील माजी खासदार व भाजपा नेते धनंजय महाडीक, समरजीत घाटगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून दूध आंदोलन केलं.

यावरून आता, गृहराज्य मंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एकाचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर निशाणा साधला. “भाजपचं कोल्हापुरातील दुधासाठीचं आंदोलन म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठीचा प्रयत्न आहे”, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला.

‘सरकारला मंदिराऐवजी मदिरालये सुरू करायची गरज वाटली, बहुदा दारूच्या दुकानात कोरोना येत नाही’

तसेच, “चंद्रकांत पाटील हे पुण्याचे, सुट्टीसाठी ते कोल्हापुरात येतात. हिंमत असेल तर त्यांनी केंद्राविरोधात आंदोलन करावं. ते केंद्र सरकारविरोधात आंदोलन का करत नाहीत”, असा खोचक सवाल सतेज पाटील यांनी विचारला.तर, “काही तरी अस्तित्व दाखवण्यासाठी हे आंदोलन आहे. लोकांच्या हितासाठी हे आंदोलन नाही. तुम्ही काय काम केलं हे जनतेला माहित आहे. दूध उत्पादकांची कणव भाजपला नाही. केंद्राची जबाबदारी महत्वाची आहे” असं सतेज पाटील म्हणाले.

दुधातील भेसळ रोखल्याशिवाय दुध उत्पादकांना कायमचे अच्छे दिन येणार नाहीत – अनिल देठे पाटील

कोल्हापुरात महाडिक-पाटील हे कट्टर विरोधक मानले जातात. याआधी महाडिक हे राष्ट्रवादीतर्फे खासदार होते, तर सतेज पाटील हे आधीपासून काँग्रेसचे नेते आहेत. हे आघाडीचे नेते असताना देखील प्रचंड मतभेद होते. तर, नंतर सत्ताबदल झाल्यानंतर महाडिक हे छुप्या पद्धतीने भाजपाला मदत करत असल्याचे आरोप पाटील लावत होते. त्यानंतर, धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी सोडत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

स्मार्ट सिटीच्या बैठकीत १३ सदस्यांनी तुकाराम मुंढेंना पाडले एकाकी;जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण ?

दरम्यान, कोल्हापूरमध्ये भाजप नेते धनंजय महाडिक, समरजीत घाटगे यांनी रस्ता रोको करुन दूध आंदोलन केलं. याप्रकरणी पोलिसांनी  धनंजय महाडिक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.