ना पंकजा ना खडसे, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची लागली वर्णी

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील फडणवीस सरकार सत्तेतून गेल्यानंतर प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची चर्चा होती. भाजपच्या प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत अनेकांची नावं होती. मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची आणि मुंबई अध्यक्ष पदाची घोषणा केली आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केली. चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भाजपचे अध्यक्षपद सांभाळतील, तर आमदार मंगलप्रभात लोढा यांनाही पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे.

Loading...

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रेशखर बानवकुळे अशी मोठी नावं चर्चेत होती. संघाच्या जवळच्या नेत्यांकडेच प्रदेशाध्यपद द्यावं, असा संघ नेत्यांचा सूर होता. मात्र चंद्रकांत पाटील अमित शाहांच्या जवळचे असल्यानं पाटलांचीच वर्णी लागणार असल्याचं बोललं जातं होतं. त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे.

2013 मध्ये चंद्रकांत पाटलांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2014 मध्ये झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवत विधानपरिषदेत त्यांनी पुन्हा प्रवेश केला. 2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजानिक बांधकाम या विभागांची सूत्रे सोपवण्यात आली होती. तर 2016 पासून चंद्रकांत पाटील महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्री होते.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन