भाजप उमेदवाराला पाठिंबा द्या ; चंद्रकांतदादा मातोश्रीवर

मुंबई : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील मातोश्रीवर दाखल झाले आहेत. विधान परिषद पोटणीवडणुकीसाठी ही भेट आहे. भाजप उमेदवाराला पाठिंबा मागण्यासाठी चंद्रकांत पाटील मातोश्रीवर दाखल झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ते पाठिंबा मागणार आहेत.

Loading...

दरम्यान, नारायण राणे यांनी काँगेसला सोडचिट्ठी दिल्यानंतर विधानपरिषदेत खाली झालेल्या जागेवर 7 डिसेंम्बर ला पोटनिवडणूक होणार आहे. त्यात भाजप कडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे इच्छुक आहेत पण याबाबत राणे यांनी अजून दुजोरा दिला नाहीये. तर शायना एनसी , माधव भंडारी यांची नावे चर्चेत आहेत . नारायण राणे यांना मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी ही निवडणूक त्यांना जिंकणे महत्वाची आहे पण शिवसेनाचा राणेंना कडवा विरोध पाहता चंद्रकांत पाटील यांची ही मातोश्री भेट राणेंच्या पथ्यावर पडते का हे पाहण्यासारखं आहे .

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...