‘सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटील मतिमंद आणि मानसिक रुग्णासारखी वक्तव्य करत आहेत’

hasan mushrif vs chandrakant patil

कोल्हापूर : राज्यात पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुका जवळ आल्या आहेत. १ डिसेंबर रोजी राज्यातील विविध विभागात मतदान होणार असून महाविकास आघाडी विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीसाठी भाजपचं कडवं आव्हान असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी पुण्यात आयोजित ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर देखील अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली.

‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. चंद्रकांत पाटील यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खरमरीत टीकास्त्र सोडलं आहे. ‘महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटील मतिमंद आणि मानसिकरुग्णासारखी वक्तव्य करत आहेत.चंद्रकातदादा वेड्यासारखं आणि डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वक्तव्य करून ते आपलं हसं करून घेत आहेत,’ असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या