चंद्रकांत पाटील यांचा केंद्र सरकारला घरचा आहेर; म्हणाले…

Chandrakant Patil

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज विभागीय आयुक्त सौरभ राव आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनाचे काय झाले? याचाही त्यांनी आढावा घेतला. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, सीईओ अमन मित्तल या अधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील यांची बैठक झाली. महात्मा फुले योजनेमधून नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला पाहिजे, असं मत आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये कोरोना साहित्य खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. कुणाच्या तरी वेंडरची मर्जी सांभाळण्यासाठी खरेदी केली आहे. त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

मराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. भाजप मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या बरोबर आहे, मात्र ज्या वेळी गरज होती त्यावेळी विरोधकांचे मत घेतले नाही, अशी खंत देखील पाटील यांनी व्यक्त केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मिळून अनुदान द्यावं, त्याबाबत आज शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय होईल, असेही यावेळी म्हणाले.

पहा व्हिडिओ :

चंद्रकांत पाटील यांचा केंद्र सरकारला घरचा आहेर

चंद्रकांत पाटील यांचा केंद्र सरकारला घरचा आहेर#ChandrakantPatil #NarendraModi

Posted by Maharashtra Desha महाराष्ट्र देशा on Wednesday, September 16, 2020

महत्वाच्या बातम्या :