पराभवाच्या भीतीनेच सर्वत्र विरोधक एकत्र येत आहेत- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचेच सरकार २०१९ च्या निवडणुकीनंतरही सत्तेवर येणार या भीतीनेच सर्वत्र विरोधक एकत्र येत आहेत. पण, हे सारे विरोधक एकत्र येण्याचीच आम्ही वाट पाहतोय. जनमताची शक्ती सोबत असताना आमचा संपूर्ण परिवार प्रचंड ताकदीने निवडणुकांमध्ये उतरणार असल्याचे सांगत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना आव्हान दिले.रेठरे बुद्रुक (ता.कराड) ग्रामपंचायतीवर भाजपची निर्विवाद सत्ता आली असून, सरपंच व पदाधिकारी मंडळाच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजप प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, मदनराव मोहिते, डॉ.सुरेश भोसले यांची उपस्थिती होती.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकसभा मतदार संघातील भाजपच्या पराभवाचे नेमके विश्लेषण विरोधकांनी करावे, मुलायमसिंग यादव यांचे पुत्र व मायावती अशा दोन शक्ती तेथे तेवीस वर्षांनंतर एकत्र आल्या. तेथील मुख्यमंत्रीही या मतदारसंघाचे २५ वष्रे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे थोडे गाफील राहीले गेले. अशातच केवळ ३७ टक्केच मतदान झाले आणि भाजप उमेदवाराचा पराभव झाला. मतदानाची टक्केवारी दोन चार टक्क्याने अधिकची असती तर दोन मोठे पक्ष एकत्र येऊनही भाजपने निश्चित त्यांचा पराभव केला असता. हे सारे विचारात घेता उत्तरप्रदेशमधील पराभव चिंताजनक नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. हे सर्व युपीतील एका पराभवामुळे होत असल्याचे सांगत विरोधक एकत्र आल्यास आम्हीही जनमताची शक्ती व आमचा संपूर्ण परिवार बरोबर घेऊन प्रचंड ताकदीने व जिद्दीने निवडणुकांना सामोरे जाऊ आणि विजय मिळवू.