महविकास आघाडीची ‘नाचत येईना अंगण वाकडं’ अशी अवस्था: चंद्रकांत पाटलांचा टोला

chandrakant patil dudh andolan

मावळ: आज दूध उत्पादक राज्यभर पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. २० जुलैपासुन महायुतीसह अनेक शेतकरी संघटनांनी दुधाच्या भावासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर, काही दिवसांची मुदत देत सरकारला इशारा देण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्यांना दूध दरवाढ देण्याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने पुन्हा एकदा आंदोलनाचा बडगा उगारला आहे.

लाॅकडाऊनकाळात आघाडी शासनाने शेतकऱ्यांकडे सपशेल दुर्लक्ष केले.दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मुख्यमंत्री म्हणतात, मला शेतीतले काही कळत नाही. परंतु, रात्री १ वाजेपर्यंत पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी जसे लक्ष घालता तसे लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घाला. ‘नाचता येईना म्हणे अंगण वाकडे’, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मावळ तालुक्यातील नायगाव येथील पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नायगाव शीतकरण केंद्रावर शनिवारी सकाळी राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन करण्यात येत आहे.

अण्णाभाऊंचे योगदान हे कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी – उद्धव ठाकरे

या आंदोलनावेळी,  माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, लोणावळच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, सायली बोत्रे, नितीन मराठे, अविनाश बवरे,गुलाबराव म्हाळस्कर ,दत्तात्रेय शेवाळे, रामविलास खंडेलवाल, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

तुळजापूर – राज्यसरकारला दुधदरवाढ करण्याची सुदबुध्दी देण्यासाठी भाजपाने घातला जागरण गोंधळ

तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आहेत, त्यांनी तरी शेतकऱ्यांना भावना समजून शेतकरी हिताच्या निर्णयाला प्राधान्य दिले पाहिजे. सध्या कोरोनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था विस्कटलेली आहे. दूधधंदा हाच शेतकऱ्यांचा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सरकारने दुधाला प्रति १० रूपये भुकटीला ५० रुपये अनुदान दिले पाहिजे असे आवाहन राज्य सरकारला पाटील यांनी यावेळी केले.

‘राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये’

दरम्यान, दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला शनिवारी सकाळी सुरुवात झाली. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात संत नामदेव पायरीला विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करुन आंदोलनाची सुरुवात केली. तर शिर्डीच्या पुणतांब्यातही शेतकऱ्यांनी बळीराजाच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत आंदोलन सुरु केले. यावेळी शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळालाच, पाहिजे अशी घोषणाबाजीही केली.