मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ‘ईडी’समोर महत्त्वपूर्ण खुलासा केला असून कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत आहे, असा गंभीर आरोप सीताराम कुंटे यांनी केला आहे. ७ डिसेंबर रोजी मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास करत असताना कुंटे यांनी ही माहिती ईडीला दिली आहे.कुंटे यांनी देशमुख यांच्या हस्तक्षेपाची कबुली दिल्यामुळे भाजपकडून पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख तसेच मविआ सरकारवर टीका केली आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी गत झाली आहे. यांच्या भ्रष्टाचारांच्या मालिका संपता संपत नाहीत. देशोधडीला लागलेल्या देशमुखांवर पुन्हा एकदा करण्यात आलेले आरोप हे त्यांनी भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराची सीमा कितपत गाठली होती, हे दाखवून देतात.’ तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुखांवर पोलीस आणि विशिष्ट पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा आरोप केला आहे. जो माणूस १०० कोटींची वसुली करू शकतो, तो काहीही करू शकतो, यात शंकाच नाही, असेही पाटील म्हणाले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 'दुष्काळात तेरावा महिना' अशी गत झाली आहे. यांच्या भ्रष्टाचारांच्या मालिका संपता संपत नाहीत. देशोधडीला लागलेल्या देशमुखांवर पुन्हा एकदा करण्यात आलेले आरोप हे त्यांनी भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराची सीमा कितपत गाठली होती, हे दाखवून देतात.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 29, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘या सरकारने पोलीस बळाचा चुकीचा वापरसुद्धा केला आणि राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र पोलिसांची बदनामीही केली. मात्र आता या सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांचं पितळ उघडं पडत आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून बेहिशेब संपत्ती गोळा करणाऱ्या देशमुखांना आणि अशा सर्व मंत्र्यांना चपराक बसणं गरजेचं आहे.’
महत्वाच्या बातम्या:
“अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत होते”, सीताराम कुंटेंचा गंभीर आरोप
“दूध का दूध म्हणणाऱ्या अनिल देशमुखांमागे खरे सूत्रधार कोण?”, अतुल भातखळकरांचा सवाल
‘मास्कमुक्त महाराष्ट्र’ चर्चेवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले…
‘ठाकरे सरकारचा वसुलीचा धंदा…,’ कुंटेंनी केलेल्या खुलास्यानंतर सोमय्यांचे टीकास्त्र
“वाईन विक्रीचा निर्णय संजय राऊत शेतकरी हिताचा सांगताहेत, जनता एवढी दुधखुळी नाही”