पवार कुटुंबातील एकही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही – चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार यांनी त्यांच्या कुटुंबाने घराणेशाहीचा उत आणला आहे, आधी जाहीरकरून पुन्हा पराभव दिसल्याने पवार यांनी माघार घेतली, आता त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती लोकसभेत जाणार नाही, अशी परिस्थिती असल्याचं मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे, महाराष्ट्रातील १४ जागांसह देशातील ११७ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. पाटील यांनी तपोवन मैदान येथील डी डी शिंदे सरकार शाळेत मतदानाचा हक्क बजावला, यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करत, राज्यात भाजपला ४५ जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात युतीचा विजय होईल, साताऱ्यात देखील युतीचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या सभांचा काही परिणाम होणार नाही, असेही पाटील म्हणाले.

राज ठाकरेंच्या सभांचा परिणाम होणार नाही, मनसेपेक्षा लोकांचा मोदींवर विश्वास –

भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील आता राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम होणार नाही, मनसेपेक्षा लोकांचा मोदींच्या कामावर विश्वास असल्याचं सांगितले आहे. राज ठाकरे हे २०१४ ला वेगळ बोलत होते, आज वेगळ बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करण्यासाठी लोक बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.Loading…
Loading...