‘अमरावतीच्या पालकमंत्री या विशिष्ट समुदयाची मते महाविकास आघाडीला मिळावीत यासाठी…’

‘अमरावतीच्या पालकमंत्री या विशिष्ट समुदयाची मते महाविकास आघाडीला मिळावीत यासाठी…’

patil-thakur

मुंबई : माध्यमांशी संवाद साधत असतांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना धार्मिक स्थळाची नासधूस झाल्याची बनावट चित्रफित पसरवून मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे दंगली घडवून आणल्या गेल्याचा आरोप करत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी करण्यात यावी,अशी मागणी भाजपातर्फे केली आहे.

यावेळी बोलत असतांना पाटील म्हणाले की,’त्रिपुरामध्ये कोणतीही मशिद पाडली गेलेली नसताना एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करुन मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये एका समाजाच्या समूहाने हिंसाचार केला. त्याची प्रतिक्रिया म्हणून अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर आले. त्यांना अटक करण्यात आली. हे सर्व न कळणारे आहे. २०१४ ते २०१९ मध्ये भाजपाचे सरकार असताना एकही दंगा झाला नाही. मात्र ४० हजार लोकांचा मोर्चा निघतो त्याची सरकारला पूर्वकल्पना मिळत नाही. त्यांनी निष्पाप लोकांच्या मालमत्तेचे नुकसान केले तरीही त्यांच्यावर कारवाई नाही. अशा घटना रोखण्यासाठी निघालेल्या लोकांवर मात्र कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यासाठी भाजपातर्फे राज्यात आंदोलन करत आले होते.’

दरम्यान, पुढे ते म्हणले की,’अमरावतीच्या पालकमंत्री या विशिष्ट समुदयाची मते महाविकास आघाडीला मिळावीत यासाठी त्यांना पदराखाली घालत आहेत. त्यांना वाचवत आहेत हे चालणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली हे पालकमंत्र्याना चालले नाही. तसेच सुरुवात ज्यांनी केली त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात की नाही. त्यावर प्रतिक्रिया दिलेल्यावर कारवाई केली’, असेही पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या