नारायण राणे फुटपाथवर झोपायचे, बाळासाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री केलं- पाटील

Narayan-Rane.

सांगली: सामान्य व्यक्तींना मोठ्या पदापर्यंत पोहचवण्याचे काम केवळ भाजप – शिवसेनेने युतीने केले आहे, नारायण राणे हे पहिलं फूटपाथवर झोपायचे, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री केलं, असे विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. सांगलीमध्ये लोकसभा युतीचे  उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

सामान्य लोकांना मोठ्या पदावर पोहचवण्याचे काम युतीशिवाय कोणतेही सरकार करू शकत नाही, सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे गोपीचंद पडळकर यांना सर्वात मोठी ऑफर भाजपने दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, नारायण राणे हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदतीची भूमिका घेत आहेत, तर पाटील यांनी त्यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे, तसेच सांगलीमधील बंडखोरी रोखण्यासाठी पडळकर यांना नेमकी काय ऑफर दिली गेली, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.Loading…
Loading...