fbpx

बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना नोकरी आणि १० लाखांची मदत कधी? ; पाटील म्हणतात…

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबियांना १० लाख अन् नोकरी कधी देणार? या प्रश्नाला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

गुन्ह्यासंदर्भात जिल्ह्याचे एसपी आणि कलेक्टर यांची एक समिती असते. ते त्यांचा अहवाल राज्य सरकारला देते. दिलेल्या अहवालापासून न्यायिक प्रक्रिया पूर्ण होत असते आणि ती आत्ता सुरू आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना नोकरी आणि १० लाखांची मदत, याबाबत सोमवारी माहिती घेऊन सविस्तर उत्तर देऊ, असेही पाटील यांनी म्हंटले.