केंद्रात भाजपच्या किती जागा येणार ? चंद्रकांतदादांनी सांगितलेला आकडा ऐकून तुम्हीही घालाल तोंडात बोट

जळगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळणार आहे. कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा कोणाशीही पैज लावायला हरकत नाही, केंद्रात भाजपच्या २९० तर राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच्या ४४ जागा येतील, असा विश्वास राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील हे जळगाव जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत, यावेळी जळगाव येथे बोलताना पाटील यांनी ‘पश्चिम महाराष्ट्रातील १० पैकी १० जागा भाजप-शिवसेना युती पटकवणार आहे, असा दावा केला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळेल हे कोऱ्या कागदावर लिहून घ्या किंवा याबाबत पैज लावालयलाही तयार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यात पुणे, बारामती, मावळ, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या महत्वाच्या जागांचा समावेश आहे. त्यामुळे २३ मे ला जाहीर होणाऱ्या निकालावर सगळ्याचं लक्ष लागले आहे.