मुंबई: राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यावर अद्याप असा कुठला ठोस तोडगा निघाला नसल्याने हे आंदोलन अजूनही सुरू असून विरोधी पक्ष महाविकास आघाडी सरकारवर टीका करतच आहे. एसटी बंद असल्याने सामान्य नागरिकांचे खूप नुकसान होत आहे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची देखील गैरसोय होत आहे.
एसटी संप आणि एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यावरुन राजकारण देखील रंगत आहे. भाजप नेते चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विशेणवर भाष्य केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, एसटी डेपोंच्या भूखंडावर काही लोकांचा डोळा असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, या सरकारला एसटीचं नेटवर्क मोडून काढायचं आहे. कुण्यातरी प्रायव्हेट वाहतूकवाल्यांशी बहुदा यांचं काँट्रॅक्ट झालं आहे. हे सगळे मोठ मोठे डेपो विकायचे आहेत. जमिनीवर डोळा असणारेच हे लोक आहेत आणि म्हणूनच एसटी संपावर तोडगा निघत नाहीये. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही कधी जमिनी लाटल्या नाहीत. हे जमिनी लाटण्यासाठी सुरू आहे हे तुम्हाला नाही कळणार, असं पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
‘नया नया पंछी ज्यादा फडफड करता है’; विजय वडेट्टीवार यांची पडळकरांवर टीका
किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर स्टार प्रवाहची पहिली प्रतिक्रिया; ‘महिला नायिकांशी गैरवर्तन..’
औरंगाबादेत मोकाट जनावरांचा सुळसुळाट; महापालिकेची ‘ती’ घोषणा हवेतच विरली!
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी राणांचा शिवसेनेवर हल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल