एक सामान्य नागरिक म्हणून चंद्रकांतदादांची राज ठाकरेंकडून ‘ही’ आहे अपेक्षा

टीम महाराष्ट्र देशा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेड पाठोपाठ सोलापूरमध्ये सभा घेत भाजप सरकारची पोलखोल केली आहे, डिजिटल गाव म्हणून सरकारकडून जाहिरात केल्या जाणाऱ्या हरिसाल गावाचा ग्राउंड रिपोर्ट माडल्यानंतर, आता हरीसालच्या जाहिरातीमध्ये ‘मी लाभार्थी’ म्हणून दाखवलेल्या युवकाला थेट स्टेजवर आणत राज यांनी भाजपचा बुरखा फाडला आहे.

दरम्यान,राज ठाकरे हे आपल्या महाराष्ट्राचे हुशार नेते आहेत पण त्यांनी दोन्ही पक्षांची योग्य ती भूमिका मांडावी अशी माझी ‘एक सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा आहे’, असं महसुल मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी लोकसभेच्या रिंगणात मनसेचे काही उमेदवार उभे करून स्वत:च्या पक्षाचा प्रचार करायला हवा होता, असा टोला चंद्रकांत दादा पाटलांनी लगावला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.ज्या काँग्रेसने त्यांच्यावर वारंवार टीका केली. त्याच काँग्रेसचा राज ठाकरे आता प्रचार करत आहे, असही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.