अवघ्या २१ वर्षांच्या प्रणाली चिकटे या मुलीच्या कार्याला चंद्रकांत पाटलांनी देखील केला सलाम

अवघ्या २१ वर्षांच्या प्रणाली चिकटे या मुलीच्या कार्याला चंद्रकांत पाटलांनी देखील केला सलाम

पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नेहमी समाज माध्यमावर खूप सक्रीय असतात, विविध प्रकारचे संदेश ते या माध्यमावर देत असतात. कधी विरोधी पक्षांना टोला तर कधी आपल्यातर्फे आणि आपल्या पक्षातर्फे काय काम केली जात आहेत या संदर्भात ते माहिती देत असतात.दरम्यान चंद्रकात पाटील यांनी नुकतीच आपल्या ट्वीटरवरून एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी प्रणाली चिकटे या मुलीच्या कार्याला सलाम केला आहे.

प्रणाली चिकटे या मुलीने एक महत्वाचा संदेश समाजाला देण्यासाठी एक अनोखा उपक्रम चालू केला आहे. वेगाने होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि महिलांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील अवघ्या २१ वर्षाची प्रणाली चिकटे संपूर्ण राज्य सायकलीने पिंजून काढते आहे आणि ती हा प्रयोग गेले ११ महिन्यांपासून अविरत करत आहे. २० ऑक्टोबर २०२० पासून सुरु झालेला हा तिचा प्रवास अजून हि सुरु आहे. तिने आता पर्यंत १४ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

प्रवासादरम्यान तिने पर्यावरणाचा शाश्वत दृष्टीकोनातून अभ्याससुद्धा केला तसेच महिलांच्या प्रश्नांकडे सुद्धा तिने समाजाचे लक्ष वेधले आहे.तिच्या याच कार्याचा सन्मान करण्साठी चंद्रकांत पाटील यांनी प्रणालीच्या सायकल यात्रेचा संदेश ट्वीटर करत समाजाला एक सकारात्मक संदेश दिला आहे.

महत्वाच्या बातम्या