मुंबई : पनवेलच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत असताना भाजप नेते चंद्रकांत पाटील हे असं काहीतरी बोलून गेले, ज्याची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत शिवसेनेच्या अनेक आमदार, खासदारांना घेऊन एक स्वतंत्र गट तयार केला. या गटाने भाजपशी युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. सगळ्यांना वाटत होत कि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार मात्र ऐन वेळेला ही घोषणा करण्यात आली कि, मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हे विराजमान होतील. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. याच घटनेवर पाटील यांनी भाष्य केलं आहे.
“स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीपणे संभाळलं. मात्र मनावर दगड ठेवून आपण सगळ्यांनी आणि प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केला. आपल्याला या गोष्टीच दुःख झालं. परंतु हे दुःख पचवून सगळे जण हा गाडा चालवण्यासाठी पुढे आलो”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच केंद्राने जो निर्णय दिला तो देवेंद्र फडणवीस यांनी लगेच मान्य केला, त्यासाठी फडणवीसांना सलाम करूया, असे म्हणत त्यांनी उपस्थितांना उभे राहायला सांगितले.
या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच भाजपच्या मनातील खदखद सर्वांसमोर आली. यावरून आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत असून पाटलांच्या या कबुलीनाम्यावर अनेक प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. दरम्यान हे सर्व पाहून भाजपने त्यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून हा व्हिडीओ डिलीट केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Tirumala | “…तर गाडीतली शिवाजी महाराजांची मूर्ती काढा”; तिरुपती बालाजी परिसरातील खळबळजनक घटना । पहा VIDEO
- NCP on Deepak Kesarkar | दीपक केसरकरांनी इतरांवर टीका करताना स्वतःचे रक्त तपासावे ; राष्ट्रवादीची खोचक टीका
- Nitesh Rane : नारायण राणेंना शिवसेना सोडल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, नितेश राणेंचा मोठा खुलासा
- Abu Azami | देशात नग्न फोटो शेअर केलेले चालतात, मग हिजाबलाच बंदी का?- अबू आझमी
- Chandrakant Khaire | “आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मोठे झाले, त्यांनाच विसरले” ; चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघात
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<