औरंगबादचे मध्ये चंद्रकांत खैरेंचा मास्टर स्ट्रोक

Chandrakant-Khaire

औरंगाबाद: औरंगबादचे पालकमंत्री पद जरी गेले असले तरी रामदास कदम यांना शह देण्याचं काम चंद्रकांत खैरे करत आहेत, कदमांच्या कार्यकाळात खैरे विरोधी जी फळी शिवसेनेत उभी राहत होती तिला पूर्णपणे निकृष्ठ करण्याचं काम आणि स्वतःच बळ वाढवण्याचं काम खैरे सध्या करत आहेत. तर खैरेंच्या विरोधात गेलेल्यांचं आता काही खर नाही अशी चर्चा औरंगाबाद मध्ये सुरू आहे. अशातच राष्ट्रवादीचे उदयसिंह राजपूत यांना खैरे यांनी शिवसेनेमध्ये ओढून आणल्याची चर्चा आहे.

uadysinh rajput

Loading...

अशी झाली होती चंद्रकांत खैरेंचे वजन कमी करण्यास सुरुवात

हैदराबाद मुक्ती संग्राम संग्रहालयामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचा छायाचित्रासह इतिहास मांडण्याच्या कार्यक्रमात दोन-अडीच वर्षांपूर्वी शिवसैनिक‘रामदास कदम तुम आगे बढो’च्या घोषणा देत होते. तेव्हा खासदार खैरे यांचे शिवसेनेतील वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती. तो संदेश सेनेमध्ये हवा तसा पोहचला होता. महापालिका निवडणुका होणे बाकी होते. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत उमदेवार निवडीपासून ते प्रचारात कोणते मुद्दे कसे ठेवायचे याची रणनीती कोणाच्या हातात असेल, हे स्पष्ट झाले होते. रामदास कदम यांच्यामागे सर्व शिवसैनिक असल्याचे चित्र स्पष्ट झाले. पण शिवसेनेत कोणाचे काही खरे नसते. रामदास कदमांचे वाढते प्रस्थ मातोश्रीच्या डोळ्यात भरले. औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेनेसाठी महत्त्वाची असल्याने खैरे यांना अखेर बळ मिळाले. खासदार खैरे यांना शह देण्याच्या उद्देशानेच संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर आणि पालकमंत्री रामदास कदम जे निर्णय घेतील त्यावर शिक्कामोर्तब होत असे. ही ‘समांतर’ फळी निर्माण करण्यामागे महापालिकेतील समांतर जल योजनेची पार्श्वभूमी होती. पुढे या योजनेचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय महापालिकेमध्ये झाला आणि आता पुन्हा ही योजना सुरू केल्याशिवाय शहराला दररोज पाणीपुरवठा करता येणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. अंबादास दानवे यांनीही खैरे यांच्याशी दोन हात करण्यास सुरुवात केली.

आमच्याकडे ‘दोन दास’ आहेत ‘रामदास आणि अंबादास’

खैरेसमर्थक मधल्या काळात म्हणत, ‘आमच्याकडे दोन ‘दास’ आहेत. ते साहेबांना त्रास देतात.’ रामदास आणि अंबादास अशी नावे न घेता सेनेतील गटबाजीची चर्चा पद्धतशीरपणे पोहचवली जात असे. महापालिकेतील प्रत्येक योजनेला कोणत्या गटातील कोणत्या नगरसेवकाला लाभ होतो किंवा होईल, याचीही आखणी केली जात असे. परिणामी खैरे आणि कदम यांच्यातील वाद वाढत गेला. अधून-मधून ‘आमच्यामध्ये वाद नाहीत, आम्ही एकमेकांचे मित्र आहोत,’ अशी विधाने दोन्ही बाजूने जाहीर केली जायची. पण ती करतांना सुद्धा शेजारचा एखादा शिवसैनिक हळूच डोळे मिचकवायचा.

स्थानिक नेतृत्वाला एका अर्थाने हीन दर्जाची वागणूक मिळत असल्याचे चित्र होते. पण शिवसैनिकांमध्ये त्याचा फारसा त्रास जाणवायचा नाही. नेत्यांमधील वाद चव्हाटय़ावर आल्यानंतरही मुंबईहून फारसे कोणी लक्ष घालत नव्हते. समोपचाराने घ्या, असा सल्लाही कोणाला मिळाला नाही. पुढे महापालिकेतील कामांमधून खासदार खैरे यांनी लक्ष काढून घेतले. असेही संसदेत शिवसेनेची भूमिका मांडण्याऐवजी महापालिकेतील योजनेमध्येच अधिक असल्याची टीका खरे यांच्यावर होत असे. मध्यंतरी मंदिर अतिक्रमणाचा विषय चर्चेत आला. काही धार्मिकस्थळांची अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र, या काळात मंदिर पाडू द्यायचे नाही. म्हणून खासदार चंद्रकांत खैरे आक्रमक झाले होते. त्यांनी त्या माध्यमातून पुन्हा समर्थक बांधायला सुरुवात केली.

पाणी योजनेतील वादही काहीसा मिटला, अशी स्थिती असताना भाजप-सेनेतील महापौरपदाच्या निवडणूक करारानुसार भाजपचे भगवान घडमोडे यांनी राजीनामा दिला आणि खरेसमर्थक नंदकुमार घोडले यांची महापौरपदी निवड करण्यात आली. तेव्हापासून खासदार खैरे यांचे बळ वाढविल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. मात्र, कुरघोडीच्या राजकारणात कधी या गटाचा कार्यक्रम चांगला झाला तर कधी खैरे तोंडावर पडायचे.

आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेच्या विरोधात कन्नड मतदारसंघात उमेदवार उभे केले. स्वत:चा स्वतंत्र गट केला. पण त्यांना पुन्हा पक्षाने बळ दिले. दिवंगत माजी आमदार रायभान जाधव यांच्यावरील पुस्तकाच्या विमोचनासाठी खास उद्धव ठाकरे औरंगाबादला आले. तत्पूर्वी आमदार जाधव यांनी खासदार खैरे यांच्याविरोधात त्यांच्या खासदार निधीतून दिलेल्या कामे निष्कृष्ट झाल्याची तक्रार करण्यात आली होती. खैरे – जाधव यांच्यामध्ये वाद विकोपाला गेले होते. जाधव यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे उदयसिंह राजपूत यांना खैरे यांनी शिवसेनेमध्ये ओढून आणले होते. अशा काळात आमदार जाधव यांच्या कार्यक्रमास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली.

पुन्हा शिवसेनेत संदेश गेला खासदार खैरे यांचे ‘मातोश्री’ वरील वजन कमी झाले. मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवारही उतरणार, अशी चर्चा सुरू झाली आणि खैरे यांच्या बाजूने पक्षप्रमुख आहेत, असा स्पष्ट संदेश देण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडून औरंगाबादचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले. या सगळया राजकीय कुरघोडीत अर्जुन खोतकर यांना मात्र त्यांचे पालकमंत्रीपद गमवावे लागले. आता फासे खैरेंच्या बाजूने पडू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेनेसाठी महत्त्वाची असल्याने खैरे यांना अखेर बळ मिळाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
'...यासाठी राज ठाकरेंची दहशत हवीच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश