विनायक मेटेंच्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या शिवसैनिकांनी केला चंद्रकांत खैरेंचा सत्कार

Chandrakant Khaire

औरंगाबाद : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या बैठकीमध्ये शिवसैनिकांनी गोंधळ घातला होता. त्या नंतर हे प्रकरण पोलिसांमध्ये गेले होते. या प्रकरणात तक्रारदार आणि शिवसैनिक यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे काम माजी खासदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले होते. खैरे यांच्या या भूमिकेबद्दल या शिवसैनिकांनी चंद्रकांत खैरे यांचा सत्कार केला.

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासह इतर काही समाजाच्या आरक्षणासाठी आक्रमक भुमीका घेतली आहे. अशा परिस्थितीत त्यांनी औरंगाबादमध्ये बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला होता. त्यात विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की देखील झाली होती. त्या नंतर हे प्ररकण पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र, विनायक मेटे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सामंजस्याची भूमीका घेतल्याने प्रकरण निवळले.

या सर्व प्रकरणामुळे पडेगाव शिवसेना शाखेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत खैरे यांचा सत्कार करत त्यांचे आभार व्यक्त केले. या कार्यकर्त्यांमध्ये उपशहरप्रमुख अंबादास म्हस्के, नगरसेवक सुभाष शेजवळ, हीरालाल वाणी, राहुल यलदी, प्रकाश दुबिले, नदंकुमार म्हस्के, संतोष आमले, किसन कनिसे यांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

IMP