विद्यार्थी प्रश्नांसाठी चंद्रकांत खैरे यांनी घेतली कुलगुरू येवलेंची भेट

Chandrakant Khaire Visited Vice Chancellor Yeole On students Problem In Aurangabad University

औरंगाबाद : तांत्रिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी आज माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. येवले यांची भेट घेतली. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना विविध परीक्षा देणे बंधनकारक केले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात आम्ही पाठवू असे सांगितले.

दरम्यान, विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी नगरसेवक गणू पांडे, शिवसेनेचे हिरा सलामपुरे, पूनम सलामपुरे, माजी सभापती राजू वैद्य या शिवसेनेच्या नेत्यांची उपस्थिती होती.

माजी खासदार खैरे एरवी महापालिका, जिल्हा परिषदेच्या विषयांमध्ये रस घेताना दिसत असतात, परंतू आज ते थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगाबादची महानगर पालिका निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. यामुळे तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या