जलील हे हैद्राबादच्या रझाकारांची औलाद – चंद्रकांत खैरे

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार यांच्या इम्तियाज जलील यांनी अनुपस्थिती दाखवली, त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय हैद्राबादच्या रझाकारांची ही औलाद असल्यामुळेच हे कार्यक्रमाला आले नाहीत. अशी टीका शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे .

एमआयएम या हैद्राबादच्या पक्षाचे इम्तियाज जलील खासदार आहेत. मुळात हैद्राबादच्या निजामाने मराठवाड्यावर राज्य केलं देश स्वतंत्र झाल्यावर १३ महिन्यांनी मराठवाडा भारतात समाविष्ट झाला. ही बाब निजाम यांना मान्य नव्हती. त्यामुळेच या खासदारांना देखील ही बाब मान्य नसल्याने ते या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात समाविष्ट होत नाहीत. असा आरोप देखील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून खासदार इम्तियाज जलील औरंगाबाद मध्यचे आमदार आहेत. आमदार असताना आणि आता खासदार झाल्यावर देखील इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात हजेरी लागली नाही. निजाम आणि रझाकारांनी मराठवाड्यातील लोकांवर अत्याचार केला होता त्याविरोधात लढा उभारल्यावर स्वतंत्र मिळालं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १३ महिन्यांनी निझामाच्या तावडीतून मुक्तता झाल्यावर मराठवाडा भारतात समाविष्ठ झाला मात्र ही गोष्ट निजामांना मान्य नव्हती,असे ही खैरे यावेळी म्हणाले.

तसेच हा पक्ष देखील तिकडचाच आहे. मी या खासदाराच नाव घेणार नाही. यांना पण निझाम राजवट गेल्याच मान्य नसल्याने हे कार्यक्रमाला उपस्थित राहत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री आले होते, मराठवाड्याचा महत्वाच्या कार्यक्रमात गैरहजर राहिल्याचा निषेध आणि अश्या लोकांचा विरोध व्हायला पाहिजे असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.