…म्हणून मुख्यमंत्री राणेंना बाजूला करत आहेत – खैरे

टीम महाराष्ट्र देशा- ‘नारायण राणे यांचा राजकारणातील आलेख आता उतरू लागला आहे, त्यांची विश्वासार्हता राहीलेली नाही. त्यामुळे त्यांचा तोल सुटू लागला आहे, याशिवाय शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवताना राणे दोन वेळा पडले, त्यामुळे त्यांची आता काहीत ताकद नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे, त्यामुळे तेही राणे यांना बाजूला करीत आहेत’ अशी खरमरीत टीका म.टा. बरोबर बोलताना शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.

नेमकं काय म्हणाले खैरे
नारायण राणे यांना बाळासाहेब ठाकरे यांनीच मोठे केले आहे. साध्या कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत त्यांना संधी दिली. ज्यांनी आपल्याला मोठे केले त्यांच्याबद्दल वाईट बोलणे योग्य नाही, हे राणे यांनी लक्षात ठेवले पाहिजे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींच्या पाया पडायचे, पण सोनिया गांधींनी त्यांना दूर सारले. शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवताना राणे दोन वेळा पडले, त्यामुळे त्यांची आता काहीत ताकद नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे, त्यामुळे तेही राणे यांना बाजूला करीत आहेत.

You might also like
Comments
Loading...