Share

Chandrakant Khaire | हळूहळू एकनाथ शिंदे म्हणतील की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे- चंद्रकांत खैरे

मुंबई : पुढील काही दिवस एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. कारण शिवसेना पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार, याचा निकाल होणार आहे. यावरून राज्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. निकाल लागयच्या आधीच दोन्ही गटांकडून चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावा केला जात आहे. अशातच शिवसेना पक्षाचे नेते चंद्राकांत खैरे यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं असून एकनाथ शिंदे पक्षाध्यक्षपदावर दावा सांगण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना हळूहळू एकनाथ शिंदे म्हणतील की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. पंतप्रधानपदाचीही स्वप्नं ते पाहतील. मग देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी काय करणार?, असा खोचक सवाल चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. प्रसार माध्यमांशी चंद्रकांत खैरे यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एकनाथ शिंदे आधी नगरसेवक झाले, नंतर सभागृहनेते झाले, आमदार झाले, विरोधी पक्षनेते झाले. शिवसेना-भाजपा युतीमध्ये त्यांना चांगली खातीही दिली. त्यांना नगरविकास खातंही दिलं. मुख्यमंत्र्यांकडचं खातं त्यांना देण्यात आलं. एवढं झाल्यानंतरही त्यांची अपेक्षा खूपच आहे आणि त्यासाठी त्यांना फोडाफोडी करायची आहे.

तसेच, हे फक्त पैशाच्या जोरावर संघटना फोडायला निघाले आहेत. यांना काही वाटत नाही का? सगळं मला मिळावं असं करू नये. एकनाथ शिंदेंनी अघोरी विद्येनं अघोरीपणा करू नये असं माझं शिंदेंना सांगणं आहे.अजून शिवसैनिक शांत आहेत. शिवसैनिक कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहेत. पण तुम्ही काहीही करायला लागलात, तर राग येणार नाही का?, असा सवाल खैरेंनी शिंदेंना केला आहे.

धनुष्यबाण आमचं लकी चिन्ह आहे

पुढे बोलताना ते असंही म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. 1968ला पालिकेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत 42 नगरसेवक धनुष्यबाणावर निवडून आले. तेव्हापासून धनुष्यपबाण चिन्ह हे आमचं लकी चिन्ह आहे.
महत्वाच्या बातम्या :

मुंबई : पुढील काही दिवस एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. कारण शिवसेना पक्षाचे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics