Share

Chandrakant Khaire | “आता पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही”, चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटाला टोला

Chandrakant Khaire | मुंबई : जेव्हापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजप (BJP) सोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पाहायला मिळतं आहे. या दोन्ही गटांमध्ये सतत कोणत्याना-कोणत्या कारणावरून वाद सुरू असतात. एवढंच नाहीतर दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप, टीका करत असतात. अशातच शिंदे-फडणवीस सरकारने मंत्री मंडळाचा विस्तार केला आहे. त्यानंतर शिंदे गटातील नेते नाराज असल्याचंं विरोधकांकडून बोललं जात आहे. अशातच याच संदर्भात चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)

शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत. त्यामुळे आता पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला चांगलाच टोला लगावला आहे. चंद्रकांत खैरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. हे 40 गद्दार पुन्हा निवडून येणार नाहीत, असं म्हणत खैरे यांनी शिंदे गटातील आमदारांना देखील डिवचलं आहे.

तसेच, संतोष बांगर यांच्याबाबत विचारले असता चंद्रकांत खैरे म्हणाले की, संतोष बांगर (Santosh Bangar) यांचे अवैध धंदे उघड करणार आहे. अवैध धंद्यातून बांगर पैसे कमावतात. फडणवीस अशा आमदारांना कसं सहन करणार? असा सवाल करत चंद्रकांत खैरे यांनी संतोष बांगर यांना टोला लगावला आहे.

त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की, एकनाथ शिंदे गटातील नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि भाजपचे नेते रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद खूप विकोपाला गेला होता. आता तो मिटला असल्याचं दिसून येतं आहे. यावरही खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद नाटकी असल्याचं खैरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Chandrakant Khaire | मुंबई : जेव्हापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजप (BJP) सोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now