Chandrakant Khaire | मुंबई : आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आहेत. यावरून सत्ताधारी पक्षनेत्यांनी त्यांच्यावक टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते तथा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी “उद्धव ठाकरेंचा दौरा फक्त 24 मिनिटांचा”, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी सत्तारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)
अब्दुल सत्तार यांची सगळी लफडी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यांचा बंदोबस्त करतो, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे काम हे सत्ताधाऱ्यांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर फिरावे. तुम्ही 50 खोके आमदारांना देता. मग शेतकऱ्यांना एखादी पेटीतरी द्या. शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. सगळे आपापल्या धुंदीत आहेत. याच कारणामुळे उद्धव ठाकरे बाहेर पडले आहेत.
त्यांच्या (उद्धव ठाकरे) हाताखाली तुम्ही (अब्दुल सत्तार) काम केलेलं आहे. तुम्ही त्यांच्यामुळेच निवडून आलेले आहात, हे विसरू नका. तुम्ही माझ्या पाया पडले, त्यांच्या पाया पडले. मला कसंही करून निवडून आणा. खैरे साहेबांना बरोबर घ्या, असे सत्तार म्हणाले होते. मी गेलो म्हणून ते निवडून आले. पण आता त्यांना मस्ती आली आहे. ते सगळीकडे फिरत असतात. कधी इकडे, कधी तिकडे. आता आजून कोणत्या पक्षात जातील सांगता येत नाही. त्यामुळे त्यानी थोडं थांबावं. आम्ही करतो त्यांचा बंदोबस्त. त्यांची अनेक लफडी माझ्याकडे आली आहेत. अब्दुल सत्तारसारखा माणूस उद्धव ठाकरेंवर टीका करतो. त्यांना हे कळत नाही, की आपण उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम केले आहे. त्याचा समाचार आम्ही घेऊ
तसेच, उद्धव ठाकरे आज मराठवाड्यातील काही भागाला भेट देणार आहेत. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडेलला आहे, जेथे लोकांचे नुकसान झालेले आहे, तिथे ते विशेषत: जाणार आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्याची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेली आहे. त्यासंबंधीची कागपदत्रे त्यांना देण्यात आली आहेत. आमचे आमदार, विरोधी पक्षनेते आपापल्या भागात फिरत असल्याचंही खैरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- India vs Pakistan । रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, पाकिस्तान प्रथम फलंदाजी करणार
- Ola Electric Scooter | Ola ची ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच
- Ambadas Danve | “… तर दिवाळीनंतर आम्ही रस्त्यावर उतरणार”, अंबादास दानवेंचा अब्दुल सत्तारांना जाहीर इशारा
- IND vs Pak | पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचे रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठं वक्तव्य
- Abdul Sattar | मराठवाडा दौऱ्यावरून अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला, म्हणाले…