Share

Chandrakant Khaire | आदित्य ठाकरेंना ‘छोटा पप्पू’ म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर चंद्रकांत खैरेंचा हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई : ‘टाटा एअरबस प्रकल्प’ (Tata Airbus Project) गुजरातला गेल्यावरून आदित्य आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यासंदर्भात बोलताना शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले. “खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही”, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. यावरून आता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी अब्दुल सत्तारांवर हल्ला केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)

अब्दुल सत्तार हा हिरवा सापच आहे. तो हिरवा सापच नसून रंग बदलणारा सरडा आहे, तो आधी हिरवा साप होता. आता सरडा झाला आहे, असं म्हणत चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, मी जे विधान केले आहे, त्याच्याशी विधानाशी मुस्लिम बांधवही सहमत आहेत. कारण सत्तार यांनी मुस्लिमांची जमीन हडप केली आहे. मी चिडलेलो आहे. आम्ही त्यांना सोडणार नाही ठाकरे घराण्याला काही बोलत असतील तर आम्ही कसे ऐकून घेणार? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगणार नाही. शिंदेच्या हातात काही नाही. त्यांचं फक्त याच्या घरी जा, त्याच्या घरी जा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे जुने मित्र आहेत. त्यांना सांगेल यांना काढून टाका. त्यांचा राजीनामा घ्या.

फडणवीस यांना सवाल आहे. तुम्ही हे का सहन करता? तुम्हाला ही बेशिस्त आवडते का? तुमचे मंत्री असे असतील तर तुमच्या सरकारचं नाव खराब होत आहे. अशा मंत्र्यांना किक आऊट करा, अशी मागणी देखील चंद्रकांत खैरे यांनी फडणवीसांना केली आहे.

तसेच, सत्तार यांनी बीड दौरा करताना जिल्हाधिकाऱ्याला दारू पिता का? असं विचारलं होतं. त्यावर खैरे म्हणाले की, एक तर त्याला मी साहेब म्हणत नाही. तो कुणालाही काही म्हणतो. तो कलेक्टरला दारू पिता का? असं विचारत असेल तर कलेक्टर शांत का बसला? तो कुणाच्या दबावा खाली होता? धनंजय मुंडेंनी कलेक्टर शर्माला इथे आणलं होतं. सत्तार यांचं हे वागणं तुम्हाला हे आवडतं का? असा सवाल मी आयएएस लॉबीला करेल.
महत्वाच्या बातम्या :

मुंबई : ‘टाटा एअरबस प्रकल्प’ (Tata Airbus Project) गुजरातला गेल्यावरून आदित्य आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यासंदर्भात बोलताना शिंदे सरकारवर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics