बाळासाहेबांचा पुतळा पाहताच चंद्रकांत खैरेंचा कंठ आला दाटून !

chandrkant khaire

मुंबई : मुंबईतील गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज अनावरण झालेआहे. या समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले आहेत. सर्वपक्षीय एकत्र आले यांचा आनंद झाला असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर इथे सत्ताधारी- विरोधक कोणी नव्हतं सगळे बाळासाहेबांच्या प्रेमापोटी एकत्र आले होते अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

यावेळी राज्यभरातील शिवसेनेचे नेते या कार्यक्रमाला हजर होते. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असलेले औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना बाळासाहेबांचा पुतळाच पाहताच कंठ दाटून आला. बाळासाहेब आमच स्फुरण आहे. त्यांच्या या पुतळ्यामधून आम्हाला लढण्याची उर्जा मिळत असल्याची भावना खैरे यांनी बोलून दाखवली. दरम्यान, आज आमचा उर भरून आला असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.

दरम्यान, या सोहळ्याला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदी बडे नेते उपस्थित होते. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या कार्यक्रमास अनुपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात कुजबुज सुरु झाली आहे. तर अजित पवार पुण्यात असल्याने ते उपस्थित राहू न शकल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या