शहांचा स्वबळाचा नारा तर चंद्रकांतदादा म्हणतात ‘जरा दम धरा’

दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर दिल्लीत अमित शहांनी खासदारांना युतीचा विचार न करता तयारीला लागा असे सांगितले आहे.मात्र महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,योग्य दिशेने चर्चा चालू आहे.युतीबाबत उशीर करण्यात अर्थ नाही असा गौप्यस्पोटच पाटील यांनी केला.

युतीबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना स्वबळाची भाषा करत आहे.त्याला अमित शहांनीही तशीच भूमिका घेत तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.यावरून भाजपचे केंद्रीय नेते आणि प्रदेश नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारणात अनेक फेरबदल होणार हे निश्चित आहे. भाजप- शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यामधील युती-आघाडीच्या चर्चेनंतरच महाराष्ट्रातील राजकारणाचे भवितव्य ठरणार आहे.

You might also like
Comments
Loading...