fbpx

भाजपाविरोधी महाआघाडीची जोरदार मोर्चेबांधणी ? चंद्राबाबूंनी घेतली शरद पवारांची भेट

टीम महाराष्ट्र देशा : सध्या राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधी महाआघाडी स्थापन करण्याचे विरोधकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मध्यंतरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

तर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेले तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली. संसदेत या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांशी काहीवेळ चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

२०१९  पर्यंत भाजपाविरोधी महाआघाडीची मोट बांधली जाण्याच्या शक्यता वाढल्या होत्या. त्यात आता चंद्राबाबू आणि पवारांची भेट झाल्याने पुन्हा नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.

3 Comments

Click here to post a comment