नरेंद्र मोदी म्हणजे कट्टर दहशतवादी, चंद्रबाबू नायडूंचा घणाघात

टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खतरनाक दहशतवादी असल्याचं वादग्रस्त विधान आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केले आहे. तसेच अल्पसंख्याक समाजाने त्यांना पुन्हा मतदान केल्यास या समाजासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात, असा इशारा देखील नायडू यांनी दिला आहे. दरम्यान देशाच्या पंतप्रधानांना दहशतवादी संबोधल्याने चंद्रबाबू नायडूंवर टीकेची झोड उठली आहे.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी चंद्र्बाबुंची तुलना ‘बाहुबली’ चित्रपटातील भल्लालदेवशी केली होती, याच टीकेचे प्रत्युत्तर देताना नायडू यांची जीभ घसरली आहे.

यावेळी मोदी देशासाठी घातक असल्याचे कळून चुकले, त्यामुळे त्यांची साथ सोडून एनडीएला सोडचिठ्ठी देणारा मी पहिला व्यक्ती असल्याचं चंद्रबाबू म्हणाले आहेत.