भाजपला आणखी एक धक्का; तेलगू देसम ‘रालोआ’तून बाहेर

नवी दिल्ली : तीन जागांच्या लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवातून भाजप सावरत असतानाच आता केंद्र सरकारमधून बाहेर पडल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने आता एनडीएमधून देखील बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तेलगू देसम पार्टीच्या पॉलिट ब्यूरोची बैठक पार पडली. त्यानंतर चंद्राबाबूंनी नवी दिल्लीत आपल्या खासदारांशी संपर्क साधून तशा सूचना दिल्या आहेत. पक्षाकडून लवकरच याबाबतची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, मोदी सरकारने ही मागणी मान्य केलेली नाही. त्यामुळे आंध्र प्रदेशमधील राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. आंध्र प्रदेशमधील विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वायएसआर काँग्रेसचे नेते दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची भेट घेत आहेत. तरभाजपाचा मित्रपक्ष आणि आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलगू देसम पक्षानेही मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. एनडीएमधून देखील बाहेर पडण्याचा निर्णय टीडीपीने पत्र लिहून आपला निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना कळवला आहे.

सरकारविरोधातील अविश्वास ठरावाला टीडीपीचा पाठिंबा
आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावर वायएसआर काँग्रेस आज (शुक्रवारी) संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहे. या अविश्वास ठरावाला समर्थन देण्याची घोषणा चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. या अविश्वास प्रस्तावाबाबत वायएसआर काँग्रेसला टीडीपीसह इतर विरोधी पक्षांचंही समर्थन मिळू शकतं.

You might also like
Comments
Loading...