… तर चंद्राबाबूंना होऊ शकतो दोन वर्षांचा तुरुंगवास

टीम महाराष्ट्र देशा : चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या भ्रष्टाचारासाठी त्यांना दोन वर्षांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो, असे भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सांगितले आहे. त्यासाठी त्यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना त्यांच्याविरोधातील सर्व पुरावे केंद्र सरकारला देण्याचे आवाहन देखील केले आहेत.

‘केंद्र सरकारने आंध्र प्रदेशच्या जनतेसाठी दिलेला पैसा लोकांपर्यंत पोहचलाच नाही. तो पैसा कुठे गेला. तो पैसा परत मिळवायला हवा. हा चोरीचा प्रकार जनतेच्या व केंद्र सरकारच्या समोर आणायला हवा. या चोरीच्या सर्व फाईल्स सीबीआयकडे व ईडीकडे चौकशीसाठी पाठवायला हव्या’, असे देवधर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.